मुंबई : राज्यभर शेतकरी संपाचा परिणाम मुंबईवर जाणवायला लागलाय. मुंबईत भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटलीय. पुरवठा कमी झाल्याने दरवाढीचे चटके बसायला सुरूवात झालीय.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातून एकही ट्रक मालाची आवक झाली नाही. परराज्यातून अवघे साडेतीनशे ट्रक भाजीपाला आणि फळांची आवक झालीय.
राज्यभरातून साठ टक्के भाजीपाला, फळं, मुंबईत येतात. यात नाशिक, पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीपाल्याचा मोठा समावेश असतो. राज्यातून येणारी आवक पूर्णपणे थांबलीय. त्यामुळे मोठा परिणाम दरांवर जाणवतोय.
गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भाजापाल्याचे साडेतीनशे ट्रक मुंबईत आले. बाजारसमितीत कांद्याचा एकही ट्रक आलेला नाही. आवक घटल्याने घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झालीय. किरकोळ बाजारातील दरांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झालीय.