मुंबई : अखेर वसई विरार परिवहन सेवेचा संप अखेर मिटला आहे. श्रमजीवी संघटने अध्यक्ष विवेक पंडित, ठेकेदार मनोहर सकपाळ यांची वसई विरार महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्या दालनात चर्चा होऊन संप मिटला.
बडतर्फ केलेले सर्वच कामगार सेवेत घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांचे आश्वासन दिलं. शासनाच्या नियमानुसार किमान वेतन देण्याची प्रक्रिया शासनाकडे प्रलंबित असल्याने त्यांच्या निर्णयानुसार दिल्या जाणार आहेत.
सर्वच कामगारांचे पगार बँकेत जमा होणार, पी एफ कापल्या जाणार, यासह अन्य मागण्या वर चर्चा होऊन संप मिटला आहे.