भाऊ आणि वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७ वर्षाच्या पुतन्याची हत्या

मुंबईत सात वर्षाच्या पुतन्याची हत्या

Updated: Jan 28, 2019, 04:48 PM IST
भाऊ आणि वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७ वर्षाच्या पुतन्याची हत्या title=

मुंबई : सख्खा भाऊ आणि वहिनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका नराधमानं सात वर्षाच्या पुतन्याची हत्या केली आहे. मुंबईतल्या गोवंडी इथल्या शिवाजीनगर परिसरातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. नौशाद अल्लाऊद्दीन अब्बासी असं या आरोपीचं नाव आहे. नौशाद शिवाजी नगरमध्ये आपल्या भावासोबत राहत होता. भाऊ आणि वहिनीसोबत त्याची सतत भांडणं होतं असत. याचा राग मनात धरुन नौशादनं शनिवारी इरफान या त्याच्या सात वर्षांच्या पुतन्यावर फुटलेल्या बाटलीनं वार केले. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं इरफानचा मृतदेह जवळच्या रिक्षा स्टँडजवळ फेकून दिला. 

दरम्यान खेळण्यासाठी बाहेर गेलेला इरफान घरी आला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इरफानचा मृतदेह सापडला. चौकशीअंती नौशादनं चिमुकल्या इरफानची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी नौशादला पोलिसांनी अटक केली आहे.