...जेव्हा अमिताभ यांच्या बंगल्यासमोर गाडीच्या बोनेटवर उभे राहिले उदयनराजे

झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली.

Updated: Apr 7, 2019, 10:11 PM IST
...जेव्हा अमिताभ यांच्या बंगल्यासमोर गाडीच्या बोनेटवर उभे राहिले उदयनराजे title=

मुंबई : 'झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली. मुंबईमध्ये अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी केलेल्या कसरतीचा किस्सा उदयनराजेंनी सांगितला.

'मुंबईमध्ये बोनेटवर बसून फिरायची पैज लागली होती. तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर ट्रॅफिक पोलिसांनी अडवलं. अमिताभ बच्चन वरून दिसतात का, हे पाहायचं होतं. तेव्हा ट्रॅफिक पोलीस आले. वर का बसलात असा सवाल पोलिसांनी विचारला. तेव्हा माझी गाडी आहे, आत बसेन किंवा वर बसेन. तुमचा काय संबंध आहे? यानंतर पोलिसांनी आरसी बूकची मागणी केली. आरसी बूकमध्ये ड्रायव्हर प्लस फोर असं लिहिलं होतं. आरसी बूकमध्ये आत बसायचं वर बसायचं नाही, असं लिहिलं आहे का? असा उलटा सवाल ट्रॅफिक पोलिसाला विचारला. पोलीसही तुमचं बरोबर असल्याचं म्हणाला', असं उदयनराजेंनी सांगितलं.

याप्रकारानंतर ट्रॅफिक पोलिसाला नाव सांगितलं तेव्हा त्याने नमस्कार केला आणि या जन्मी भेटलात पुढच्या जन्मीही भेटा असं तो ट्रॅफिक पोलीस म्हणाल्याचा किस्सा उदयनराजेंनी सांगितला. एवढं सगळं करूनही अमिताभ बच्चन त्यादिवशी बंगल्यात दिसले नाहीत. पण नंतर एकदा त्यांची भेट झाली, असं उदयनराजेंनी सांगितलं. 

मुक्त चर्चा | डॅशिंग उदयनराजे भोसले यांची बेधडक मुलाखत