उत्सवांचा त्रास होतो, बांगेचा नाही - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

 उत्सवाचा ज्यांना त्रास होतो त्यांना बांगेचा त्रास होत नाही, त्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत नाही, अशा भाषेत हिंदू उत्सवांना बंधने टाकण्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

Updated: Jul 11, 2017, 08:40 PM IST
 उत्सवांचा त्रास होतो, बांगेचा नाही - उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई :  उत्सवाचा ज्यांना त्रास होतो त्यांना बांगेचा त्रास होत नाही, त्यांच्या विरोधात बोलण्याची हिम्मत नाही, अशा भाषेत हिंदू उत्सवांना बंधने टाकण्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

मुंबईतील  रंगशारदा येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. 

उद्धव ठाकरे  यांच्या भाषणातील मुद्दे 

उत्सव आयोजकांना व्यवस्थित सांगितले तर ऐकतात, दंडुक्यांनं काही होत नाही.                        

गणपती उत्सवात एकदाच लोकमान्यांची आठवण येते.

टिळकांनी त्यावेळी ओळखले त्यांनी सणाची चळवळ केली. आवश्यकता संपल्यावर आपण उत्सव केला.

आपण उत्सवात एकत्र जमतो एकसंघ राहू कसे ते आयोजकांनी पाहावे.

संकटातच आपण एकत्र का येतो ? 

अमरनाथ यात्रेनंतर आज शिवसेनेची भूमीका काय असे विचारले जाते ?

सिद्धिविनायक भिंतीच्या विरोधात काही कोर्टात गेले. हे अकलेचं दारिद्य आपल्या देशात .

आमच्या सणांवर अडथळे का ?

उत्सवांमधून आरोग्याची चळवळ पुढे न्या.

मी गॅरेंटी घेतो एकही मंडळ अतिरेकाची पायरी ओलांडणार नाही.

सायलेंट झोनच्या बडग्याचा मुद्दा कुणी पाहणार नाही.

गेल्यावेळी याच मुद्द्यावर मयुक्तमत्र्याना भेटलो. यावेळी मी म्युख्यन्त्र्यांना भेटणार नाही.

आम्ही अतिरेक करणार नाही, तुम्ही अतिरेक करू नका.

आज शिवसेना काय करते असे विचारणारे काय करीत आहेत गुलाम अलीच्या गजला ऐकत आहेत ? पाकिस्तानच्या क्रिकेट match पाहत आहेत ?

गोरक्षक आज काय करीत आहेत ?

हिंदू देवदेवतांच्या तसबिरी काढण्याचा अध्यादेश रद्द करू शकता मग उत्सवांवर निर्बंध काढण्याचा अद्यादेश का नाही काढत 

मंत्रालाय आणि मंत्र्यापेक्षा विश्वास देवांवर, मंदिरांवर.

मुख्यमंत्र्याना आवाहन आपण हिंदू आहोत, हिंदुत्ववादी सरकार आहे.

आता अमरनाथ यात्रेच्या मार्गावर संरक्षणासाठी अमेरिकेहून ट्रम्प येतील.

गोर गरिबांच्या उत्सवाच्या आड येऊ नका

पाऊस आपल्या हातात नाही, पण उत्सव वाजतगाजत होणार हे आपल्या हातात.

आम्ही पहारेकरी राखरणदार नाही, त्यापेक्षा मुंबईवर प्रेम करणारे.

पुन्हा मुंबईकरांनी शिवसेनेच्या ताब्यात दिलीय, मुंबईकरांना सेनेबाबत आपुलकी.

जंगल,झाडे मारायची आणि इमारतीवर टेरेस गार्डन.

विकासाच्या कल्पनेत आपण झाडाचे अस्तित्व विसरतोय.

विकास करताना वृक्षतोडीच्या हव्यासापायी आपण काय ओढवून घेत आहोत याची कल्पना नाही.

आज बाळासाहेबांची आठवण अनेकांना येत आहे.

बाळासाहेबांनी त्यावेळी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यावेळी केलेलं विधान प्रत्यक्षात आणण्याची ताकद आजही आमच्यात आहे. म्हणून मी काही स्वतःला बाळासाहेब समजत नाही. माझे शिवसैनिक तेच आहेत आणि ते समर्थ आहे.