सोशल मीडियाचा वापर आता उलट होतोय- उद्धव ठाकरे

सोशल मीडियात मोदी सरकारवर टीका केल्यानंतर अनेकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 30, 2017, 10:21 PM IST
सोशल मीडियाचा वापर आता उलट होतोय- उद्धव ठाकरे  title=

मुंबई : सोशल मीडियात मोदी सरकारवर टीका केल्यानंतर अनेकांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या यावर भाष्य करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. भाजवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, सोशल मीडिया वापर करुन तुम्ही सत्तेत आलात. पण, आता त्याचा उलट वापर होतोय.

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या तरुणांना तुम्ही नोटीस पाठवत आहात हे तरुण जर पेटून उठले तर जबाबदार कोण? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आक्षेपार्ह टीका करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी नोटीस पाठवली होती. कोणताही अनुचित प्रकार किंवा कृत्य घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं.