Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल

महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. 

Updated: Dec 17, 2022, 07:43 AM IST
Maha Vikas Aghadi Morcha : आज मुंबईतले 'हे' रस्ते बंद; महाविकास आघाडीचा मुंबईत हल्लाबोल title=
traffic route changes in city Maha Vikas Aghadi Morcha time

Maha Vikas Aghadi Morcha : महापुरूषांच्या अवमानाप्रकरणी आज महाविकास आघाडी मुंबईत (Mumbai) हल्लाबोल मोर्चा काढत आहे. या मोर्चात शिवसेना (Shivsena) ठाकरे गट, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पदाधिकारी आणि नेते सहभागी होणार आहेत. भायखळा एटीएस कार्यालयासमोर मोर्चासाठी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते जमण्यास सुरूवात होणार आहे. साधारण 1 लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते जमवण्याचा प्रयत्न आहे. मविआचे मुख्य नेते 12 वाजेपर्यंत मोर्चाला येतील आणि जे जे फ्लायओव्हरवरून हा मोर्चा (CSMT) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ येऊन थांबणार आहे. या मोर्चात समाजवादी पक्षाचे मुस्लीम कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोर्चाची एकंदर मार्गिका पाहता त्या अनुषंगाने वाहतुकीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

थोडक्यात मुंबईच्या दिशेनं येणारे काही मार्ग पूर्णपणे बंद असतील. तर, काही मार्गांवरची वाहतूक वळवण्यात आली आहे. भायखळा येथील रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मार्ग मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंद असेल. 

पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे 

- भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोडचा वापर करावा. याशिवाय नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल-  नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापरही करता येऊ शकतो. 

-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुल मार्गे ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल- मुंबई सेंट्रल - डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग - ऑपेरा हाऊस महर्षी कर्वे रोड (क्वीन्स रोड) चा वापर करावा. याला पर्याय म्हणून सात रस्ता सर्कल - मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल - नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या मार्गाचासुद्ध वापर करता येऊ शकतो. 

हेसुद्धा वाचा : Maha Vikas Aghadi Morcha LIVE Updates : महाविकास आघाडी मोर्चा

- लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता बावला कम्पाउंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा. 

- मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.

नवी मुंबईकडून मुंबईकडे येण्यासाठी.... 

- नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोडचा वापर करावा. नवी मुंबई, पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

- दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक दिशेनं जाण्यासाठी पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्गानं जाता येऊ शकतं.