मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील कोंडीची माहिती SMS वर मिळणार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता SMSची नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 31, 2018, 10:33 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील कोंडीची माहिती SMS वर मिळणार title=
संग्रहित छाया

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता SMSची नवी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

एसएमएसवर कोंडीची माहिती

शनिवारी आणि रविवारी प्रवाशांना रस्त्यावरच्या वाहतुकीची विद्यमान स्थिती एसएमएसवर मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना घरातून निघण्याआधीच वाहतुकीची स्थिती समजू शकेल.

वाहतूक कोंडीसाठी विशेष यंत्रणा

महामार्ग पोलीस यासंदर्भातल्या तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर ही सुविधा सुरु करणार आहेत. त्यासाठी वारंवार वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांवर विशेष यंत्रणा बसवली जाईल. 

स्वयंचलित यंत्रणा कार्याविन्त

जेणेकरून वाहन चालकांना वाहतूक कोंडीविषयी तातडीनं माहिती देण्यात येईल. क्लाऊड तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्वयंचलित यंत्रणा कार्याविन्त करण्यात येणार असल्याचं MSRDC च्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.