मुंबई: आज दिवसभरात तीन दिग्गज राजकीय नेत्यांच्या दौऱ्याकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. त्यामुळे आजचा रविवार राजकीय सुपरसंडे ठरणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज पुणे दौऱ्यावर येतायत. दुपारच्या सुमारास ते भाजप कार्यकर्त्यांना चाणक्य नीतीचे धडे देणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ नागपुरात येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भुजबळांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. तर काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येतायत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खरगे संवाद साधतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज (रविवार, ७ जुलै) नागपूरमध्ये येणार आहेत. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असल्याने त्यांच्या आगमनाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय.
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येतायत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खरगे संवाद साधतील.
भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना चाणक्य नितीचे धडे देणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे शहा यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलय. आर्य चाणक्य - आजच्या संदर्भात हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गणेश कला क्रिडा मंचामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. त्याआधी अमित शहा पक्षाच्या सोशल मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.