तीन मतदारसंघातून आज ३६ उमेदवारांचा निर्णय, मतममोजणीसाठी कडक बंदोबस्त

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे 

Updated: Jun 28, 2018, 09:15 AM IST

मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर , मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी ची मतमोजणी आज नेरुळ  येथील आगरी - कोळी भवन या सांकृतिक भवनात होणार  आहे. या तीनही मतदारसंघाच्या   36 उमेदवारांचा फैसला आज होणार असून, या मतमोजणी ची तयारी निवडणूक आयोगाने  केली आहे.मतमोजणी साठी कडक पोलीस बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार आहे. साडेसात वाजता उमेदवार आणि त्याच्या प्रतिनिधी ना प्रवेश देण्यात येणार आहे.

चार राऊंडमध्ये मतमोजणी 

कोकण पदवीधर मतदार संघासाठी  २८ टेबल माडण्यात आले असून, मतमोजणी चे सहा राउंड होणार आहेत. मुंबई शिक्षक मतदार संघा साठी १४ टेबल मांडण्यात आले आहेत.याचे अडीच राउंड होणार आहेत. मुंबई पदवीधर मतमोजणी साठी २० टेबल असणार असून, चार राउंड मध्ये मतमोजणी होणार आहे.