मुंबईत ट्राफिक कॉन्स्टेबलला धडक, तीन तरुणांना अटक

तीनही तरुण कफ परेड परिसरातले रहिवाशी

Updated: Jan 13, 2020, 05:31 PM IST
मुंबईत ट्राफिक कॉन्स्टेबलला धडक, तीन तरुणांना अटक title=
प्रतिकात्मक फोटो

मुंबई : मुंबईतल्या कुलाबा परिसरात एका ट्राफिक कॉन्स्टेबलला धडक दिल्याप्रकरणी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे तीनही तरुण कफ परेड परिसरातले रहिवाशी असून ट्रिपल सीट प्रवास करत असल्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न ट्राफिक कॉन्स्टेबल शरद नाना पाटील यांनी केला होता. मात्र पाटील यांना त्यांनी धडक दिली होती. या अपघातात शरद पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

राजेश चव्हाण, आकाश राठोड आणि गोविंद राठोड या तीनही तरुणांना अटक केली असून अपघात झालेली बाईकसुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.