पैसे डबल करुन देण्याच्या बहाण्याने लुटले लाखो रुपये

पैशांचा पाऊस पाडून पैसे डबल करुन देतो असं सांगत दोन भोंदूबाबांनी एका महिलेचे तब्बल साडे सात लाख लुटलेत. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये जप्त केलेत. 

Updated: Jun 17, 2017, 01:40 PM IST
पैसे डबल करुन देण्याच्या बहाण्याने लुटले लाखो रुपये title=

मुंबई : पैशांचा पाऊस पाडून पैसे डबल करुन देतो असं सांगत दोन भोंदूबाबांनी एका महिलेचे तब्बल साडे सात लाख लुटलेत. मिरा रोड पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये जप्त केलेत. 

बुलढाण्यातील मु्स्लिम मदरसा आणि अनाथालयात पैसे दान करण्यासाठी गेलेल्या फेमिदा मोहम्मद हुसेन यांना अजमल खान याने आपल्या जाळ्यात ओढलं. 

पैशांचा पाऊस पाडून आपण पैसे डबल करुन देत असल्याचं सांगितल्यानंतर फेमिदा त्याच्या आमिषाला बळी पडल्या. फेमिदाने दुबईतील आपल्या मुलीकडून सात लाख रुपये घेतले. 

त्यानंतर फेमिदा यांच्या घरी दोन भोंदूबाबांनी तंत्रमंत्रच्या नावाखाली पैसे घेऊन पोबारा केला. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने तीनही आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.