Terror Threat In Mumbai : मुंबईवर (Mumbai) दहशतवादी हल्ला (Terror Attack) करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) आलेल्या धमकीच्या ईमेलमुळे (Threat Email) देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे. एनआयएने मुंबई पोलिसांनाही (Mumbai Police) ही माहिती देण्यात आली आहे. एनआयएनकडून माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणा तपासात गुंतल्या आहेत. एनआयएच्या ईमेल आयडीवर मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा मेल आला होता. हा ई-मेल पाठवणाऱ्याने आपण तालिबानी असल्याचे सांगून तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हा हल्ला करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे.
तालिबानचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी याच्या आदेशानुसार देशाची आर्थिक राजधानी मुंबईला दहशतवादी हल्ल्या करण्यात येणार आहे, असा ईमेल एनआयएला आल्याची माहिती समोर आली आहे. या ईमेलमुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. या ई-मेलमध्ये मुंबईत हल्ला करुन दहशत माजवण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने त्याचे नाव सांगितलेले नसले तरी तो तालिबानी असल्याचे त्याने सांगितले आहे. तालिबानचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानीच्या सांगण्यावरून हा हल्ला करण्यात येणार असल्याचे ईमेल पाठवणाऱ्याने म्हटले आहे.
Mail threatening terror attack in Mumbai received; NIA, police initiate joint probe
Read @ANI Story | https://t.co/PNLFxSKKYD#MumbaiTerrorAttack #NIA #MumbaiPolice #Threatmail pic.twitter.com/vqxmxDBYgV
— ANI Digital (@ani_digital) February 3, 2023
धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मुंबईतील सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच ई-मेल कोणी पाठवला हे शोधण्याचा एनआयए प्रयत्न करत आहे.
हल्ल्याचा आदेश देणारा सिराजुद्दीन हक्कानी कोण आहे?
एनआयएला आलेल्या ईमेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याचा आदेश सिराजुद्दीन हक्कानीने दिल्याचे म्हटले आहे. सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा सर्वात धोकादायक गट असलेल्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानावर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर हक्कानीला गृहमंत्री बनवण्यात आले आहे. यासोबतच तो तालिबानमधील दुसऱ्या क्रमाकांचा महत्त्वाचा नेता आहे. तालिबानमध्ये हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे. एफबीआयने हक्कानीची माहिती देणाऱ्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे.