भयंकर! मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू - डॉ. शशांक जोशी

Covid 19 Third Wave in Mumbai :  एका दिवसात कोरोनाबाधित रूग्णांचा रेट हा डबलिंग 

Updated: Dec 30, 2021, 08:07 AM IST
भयंकर! मुंबईत कोरोनाची तिसरी लाट सुरू - डॉ. शशांक जोशी title=

मुंबई : मुंबईत कोरोना रूग्णांचा स्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 2 हजार 510 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ओमायक्रॉनचे 33 रुग्ण सापडले आहेत. राज्यात 3 हजार 900 नवे कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. 

बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा एवढा वाढला 

मुंबईत कोरोनाचा अक्षरशः स्फोट झालाय. मुंबईत काल दिवसभरात तब्बल २ हजार ५१० रुग्ण वाढले. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ रुग्ण आढळले होते. एका दिवसातच ही रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली. धारावीतही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागलीय. धारावीत सध्या ४३ कोरोना सक्रीय रूग्ण आहेत. (या 7 गोष्टी कराल तर ओमायक्रॉन तुमच्या जवळही फिरकणार नाही) 

महाराष्ट्र कोविडा टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी मुंबईबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका दिवसात कोरोनाबाधित रूग्णांचा रेट हा डबलिंग झाला आहे. रूग्णांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच रूग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली आहे. 

अधिक तपशील देताना डॉ. शशांक जोशी पुढे म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. परंतु ओमायक्रॉनमुळे प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. राज्य ओमायक्रॉनलाही सामोरं जाण्यास तयार आहे. (शाळांबाबत आरोग्यमंत्र्याचा मोठा निर्णय, कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर) 

त्यांनी असेही सांगितले की जीनोम अनुक्रम 80% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉन दर्शवेल आणि हे निश्चितपणे डेल्टा नाही. तथापि, इतर तज्ञांनी सांगितले की भारत आतापासून सहा आठवड्यांत ओमिक्रॉनमध्ये घसरण पाहू शकेल.

तिसऱ्या लाटेसाठी काय काळजी घेणार 

मुंबईत झपाट्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर मुंबईत तिसरी लाट सुरू झाली आहे असं डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलंय. मुंबईत गेल्या २४ तासांत जवळपास २५०० रूग्ण आढळलेत. ही तिसरी लाट सुरू झाल्याचंच लक्षण आहे असं डॉ. जोशी यांनी म्हटलं आहे. (.. अन्यथा निर्बंध कठोर होणार, आरोग्यमंत्र्यांचा इशारा) 

अर्थात तिसरी लाट सुरू झाली असली तरी पॅनिकची गरज नाही. सर्वांनी काळजी घेणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग करणं गरजेचं आहे असं डॉ. जोशी यांनी म्हटलं आहे.