'त्या' घटनेवरून राज्यपालांनी दिलं भाजप नेत्यांना हे आश्वासन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याची आणि खोटा एफआयआर नोंदविल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची मागणी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.   

Updated: Apr 27, 2022, 04:26 PM IST
'त्या' घटनेवरून राज्यपालांनी दिलं भाजप नेत्यांना हे आश्वासन title=

मुंबई : आपल्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Sanjay pande ) यांनी खोटा एफआयआर नोंदविला. त्यामुळे संजय पांडे यांना आयुक्तपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( rajypala bhagatsingh kyoshari ) यांना भेटून केल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली. 

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कशा पद्धतीने खोटे एफआयआर नोंदवले याची माहिती राज्यपालांना देण्यात आली. जो एफआयआर घेला त्यावर पोलीस निरीक्षक आणि माझी सही नाही. त्यामुळे हा एफआयआर बनावट असल्याचा दावा त्यांनी केला.

पोलीस या प्रकारात बनवाबनवी करत आहेत. हे फेक एफआयआर असल्यामुळे ते रद्द करण्यात यावे. उद्धव ठाकरे ( Uddhav thakarey ) आणि त्यांच्या माफिया सेनेने हा हल्ला केला. मी येणार असल्याची पोलिसांना पूर्व कल्पना देऊनही संरक्षण देण्यात आले नाही.  

माझ्या गादीवर ६० ते ७० जणांनी हल्ला चढविला. हे गुंड घुसले कसे? या माफिया सेनेला पाठीशी घालायचे काम संजय पांडे यांनी केले. माफिया सेनेने माझ्यावर लाठ्या, काठ्या दगड घेऊन हल्ला केला. माझ्यासोबत असलेल्या कमांडो यांनी मला वाचवलं, असे ते म्हणाले. 

पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई करावीच लागेल. आम्हला न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात जावे लागेल असा इशारा सोमय्या यांनी दिला. तसेच, राज्यपाल यांना सगळं घटनाक्रम सांगितलं यावेळी त्यांनी त्या घटनेची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले असे सोमय्या यांनी सांगितले.