आला रे हापूस आला! आब्यांची पहिली पेटी APMC मार्केटमध्ये दाखल

गावकर यांच्या आंबा बागेतील झाडाला पावसाळ्यातच मोहर आला होता. याची त्यांनी चांगली काळजी घेतली. यामुळे थंडीतच झाडाला आंबा आला आहे. 

Updated: Nov 24, 2022, 09:06 PM IST
आला रे हापूस आला! आब्यांची पहिली पेटी APMC मार्केटमध्ये दाखल title=

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई :  खवय्यांना हापूस आंब्याची(Hapus mangoe) मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. हंगामाचा पहिला हापूस आंबा मार्केट मध्ये दाखल झाला आहे. देवगडाचा हा हापूस(Devgad Hapus) आहे. यंदा नोव्हेंबरमध्येच हापूस बाजारात आला आहे. पहिल्यांदाच मार्केटमध्ये(APMC market in Navi Mumbai) दाखल झालेल्या हापूसच्या या पहिल्या पेटीला चांगली बोली लागणार आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये या हंगामाचा पहिला हापूस आंबा दाखल झाला आहे. बाजार समिती मद्ये फळ व्यापारी विजय ढोले यांच्या  निवृत्ती  नानाजी  ढोले  अँड सन्स  मध्ये सीझनच्या पहिला आंबा विक्रीसाठी आला आहे.  आंब्याच्या  दोन पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत.

देवगड तालुक्यातील पुरळ कोठड गावातील शेतकरी वसंत गावकर यांच्या शेतातील हा आंबा आहे. गावकर यांच्या आंबा बागेतील झाडाला पावसाळ्यातच मोहर आला होता. याची त्यांनी चांगली काळजी घेतली. यामुळे थंडीतच झाडाला आंबा आला आहे.  त्यांच्या हा आंबा पेटीला चांगली बोली लागणार आहे. सिजनची ही पहिली पेटी हजारोच्या किंमतीत विकली जाणार आहे.