मुंबई : मुंबईच्या उपनगरात वरुणराजा चांगलाच बरसाला. त्यात गणेशोत्सव जवळ आल्यानं अनेक मंडळांना भर पावसात गणेश मूर्ती मंडपात आणाव्या लागल्या. जोरदार पाऊस असतानाही अनेकांनी बप्पांच्या आगमन सोहळ्याला हजेरी लावली.
मुलुंडमधील मुलुंडच्या राजाचा आगमनसोहळा ढोल ताशांचा गजर, भाविकांचा उत्साह आणि गणपती बप्पा मोरयाच्या जयघोषानं दुमदुमून गेला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे रविवारी मंगलमय वातावरणात गणेश मंडळांमध्ये आगमन झाले. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले आहेत. पण मुंबईत भर पावसात ही बाप्पांच्या आगमनात तेवढाच उत्साह दिसतोय.