अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Updated: Jun 10, 2017, 07:10 PM IST
अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती title=

मुंबई : आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आणि हमीभआवाच्या मागणीवर सुकाणू समिती ठाम आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु रात्याचप्रमाणे सरकारच्या निर्णयानंतर आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

त्याचप्रमाणे समितीत कुठलेही मतभेद नसल्याचं यावेळी जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. तर  सरकारच्या निर्णयानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचा निर्णयही सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. 

दरम्यान, सरकारनं नेमलेल्या मंत्रिगटाशी सुकाणु समितीचे सदस्य उद्या चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उद्याची रणनिती ठरवण्याठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

राजू शेट्टी, जयंत पाटील, अजित नवले, अशोक ढवळे, प्रतिभा शिंदे, बी जी कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत सुकाणू समितीची बैठक माहीम कोळीवाड्यातील शेकाप भवनमध्ये पार पडली. यावेळी प्रहार संघटनेचे प्रतिनिधी देखिल उपस्थित होते.

उद्या सरकारनं नेमलेल्या मंत्रिगटाशी सुकाणु समितीचे सदस्य चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर उद्याची रणनिती ठरवण्याठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सरकारशी चर्चा करायची की? नाही या मुद्द्यावरुन सुकाणू समितीच्या बैठकीआधी दोन गट पडलेले दिसले होते.