मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Uddhav Thackeray Surgery : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर HN रिलायन्स रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

Updated: Nov 12, 2021, 09:51 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया title=
संग्रहित छाया

मुंबई : Uddhav Thackeray Surgery : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर HN रिलायन्स रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वरिष्ठ सर्जन डाँक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली.  दरम्यान, या  शस्त्रक्रियेची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सकाळी 7.30 वाजता शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. सकाळी 8.45 वाजता डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करून बाहेर आली आणि त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले. सध्या मुख्यमंत्री ठाकरे शस्त्रक्रिया विभागात आहेत. त्यांना भूल देण्यात आल्याने शस्त्रक्रिया विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेची माहीती त्यांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दिवस आधीच रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली, मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला.

त्याआधी काल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. त्यांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले होते. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकास कामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हटले तरी थोडेसे दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झाला, असे त्यांनी म्हटले.