दिवाळीत एसटीचा प्रवास महाग, १० टक्के तिकीट दरवाढ

दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी प्रवास महागला आहे. 

Updated: Oct 30, 2018, 10:04 PM IST
दिवाळीत एसटीचा प्रवास महाग, १० टक्के तिकीट दरवाढ title=

मुंबई : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी प्रवास महागला आहे. राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे एसटीचे तिकीट १० टक्क्यांनी वाढणार आहे.

एसटी महामंडळाने दिवाळीत १ ते २० नोव्हेंबरपर्यंत १० टक्के तिकीट दरवाढ लागू केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रवाशांची होणारी वाहतूक लक्षात घेउन महामंडळाने ही वाढ केली आहे. गेल्या वर्षी महामंडळाने २०,१५ आणि १० टक्के वाढ केली होती. 

या भाडेवाढीमुळे एसटीच्या महसुलात काही प्रमाणात भर पडणार आहे. एसटीने धोरणानुसार गर्दीच्या हंगामात महसुलात भर पडण्याच्या दृष्टीने भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. ही वाढ ३१ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.