रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली

तब्बल २६ वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चैन पोलिसांनी महिलेला घरी आणून दिली.

Updated: Aug 24, 2020, 05:43 PM IST
रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली title=

प्रथमेश तावडे, वसई : एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याच्या आशाही सोडून दिल्या जातात. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का लागेल ना? होय हा सुखद धक्का वसईच्या पिंकी डीकुन्हा या महिलेला लागला आहे.

तब्बल २६ वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चैन पोलिसांनी महिलेला घरी आणून दिली. यावेळी महिलेला नक्कीच आनंदाचा सुखद धक्का बसला असेल. कारण या महिलेने देखील विचार केला नसेल की, २६ वर्षाआधी चोरीला गेलेली चैन तिला इतक्या वर्षांनी परत मिळेल.

पिंकी डिकूना या १९९४ साली कामानिमित्त चर्चगेटला आल्या होत्या. लोकलची वाट पाहत असताना त्याची ७ ग्रॅमची चैन चोरुन चोराने पळ काढला होता. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. पोलिसांनी आरोपी मोहंमद निजाम नासिरला याला अटक केली. ज्यामुळे चोरीला गेलेली चैन इतक्या वर्षांनी परत मिळाली.