कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना

पंतप्रधानांसमवेत व्हीसीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

Updated: Nov 24, 2020, 01:08 PM IST
कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या उपस्थितीत कोविडचा (Covid-19) अधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातील 8 राज्यांची (8 State VC)  व्हीसीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस अत्यंत महत्वाची आहे. 

कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला (Adar Poonawalla of Serum Institute) यांच्याशी सातत्याने बोलत आहोत . महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स ( task force )  देखील स्थापन करण्यात आला आहे  असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

देशातील काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 नोव्हेंबरला कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली.. यानंतर, उर्वरित राज्यांचे मुख्यमंत्री दुपारी 12 वाजेपासून पंतप्रधानांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत सामील होतील.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा आणि कोरोना लस देण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होऊ शकेल. पंतप्रधान मोदींनी कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आतापर्यंत अनेकदा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरात दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 50 हजाराच्या खाली आली आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू देखील लागू करण्यात आला आहे.