राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय लवकरच ६० होणार

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबतचा अहवाल तयार झाला आहे. या आठवड्यात अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 6, 2017, 10:48 AM IST
राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय लवकरच ६० होणार title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबतचा अहवाल तयार झाला आहे. या आठवड्यात अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

या अहवालात निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याबाबत बी. सी. खटुआ समिती सकारात्मक आहे, म्हणूनच निवृत्तीचं वय लवकरच ५८ वरून ६० केले जाण्याची शक्यता आहे.

निवृत्तीचे वय ६० करण्यासाठी सरकार काही अटी टाकून मान्यता देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, चौकशी आणि खटले सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही हे विशेष.

३३ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्यास सरकार तयार नसल्याचंही सांगण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय होईल, असा कर्मचारी संघटनांना विश्वास आहे.