SSR case : सुशांतचा नोकर दीपेश सावंतला अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून या प्रकरणात 8व्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Updated: Sep 5, 2020, 11:14 PM IST
SSR case : सुशांतचा नोकर दीपेश सावंतला अटक title=
संग्रहित फोटो

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  (Sushant Singh Rajput) प्रकरणात, चौकशी दरम्यान आता अटक सत्र सुरु झालं आहे. या प्रकरणात ड्रग्जच्या दिशेने तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून (NCB) शनिवारी 8व्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी दीपेश सावंत नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

दीपेश सावंत सुशांत सिंह राजपूतचा नोकर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. दीपेश या प्रकरणात जी काही माहिती देईल ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 

यापूर्वी सुशांत प्रकरणात चौकशी सुरु असताना, एनसीबीने शुक्रवारी अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान अशा 5 जणांना अटक केली होती. त्यापैकी अब्बास आणि करणला काही वेळातच जामीन मिळाला होता. तर कैजानला शनिवारी जामीन मिळाला आहे. त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे.