SSC and HSC Result 2022 : या कारणामुळे बोर्डाचे निकाल रखडण्याची शक्यता

SSC and HSC Result 2022 : दहावी आणि बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता 

Updated: Mar 28, 2022, 07:35 PM IST
SSC and HSC Result 2022 : या कारणामुळे बोर्डाचे निकाल रखडण्याची शक्यता title=

मुंबई : दहावी, बारावीचा निकाल यंदा रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे. आताच झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे 1200 हून अधिक गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे. (SSC and HSC Result May be delay)

SSC आणि HSC निकाल रखडण्याची शक्यता असल्याने यामुळे विद्यार्थ्यांची आणि पालकांची चिंता वाढली आहे. सरकार आता यामधून कसा तोडगा काढतं याकडे त्यांचं लक्ष लागून आहे.

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यांसाठी सरकारला निवेदन दिले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास विनाअनुदानीत शाळांमधील तब्बल 30 हजार शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमीचा व्हिडिओ