दिव्यांग विद्यार्थ्यांनी उभारले बाप्पाचे १२८ चौ. फुटांचे कागदी कोलाज

दिव्यांग विद्यार्थ्यांनी उभारले बाप्पाचे १२८ चौ. फुटांचे कागदी कोलाज उभारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

Updated: Jul 21, 2019, 10:56 AM IST
दिव्यांग विद्यार्थ्यांनी उभारले बाप्पाचे १२८ चौ. फुटांचे कागदी कोलाज title=

मुंबई : दिव्यांग विद्यार्थ्यांनी उभारले बाप्पाचे १२८ चौ. फुटांचे कागदी कोलाज उभारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.  कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परळच्या नरेपार्क मतिमंद शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी गिरगावचा राजा पाद्यपुजन सोहळ्यावेळी हा विक्रम केला आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गिरगांव चा राजा दरवर्षी अनेक सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवत असतात. यंदा ९२ व्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुरुवातीसच अनोखा विक्रम बनवला आहे. पाद्यपुजन सोहळ्याला दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेले बाप्पाचे १२८ चौ. फुटांचे कागदी कोलाज हे मुख्य आकर्षण ठरले. 

विविध रंगांचे ११,१११ गोल कापलेल्या कागदानपासून बाप्पाचा कोलाज साकारण्यात आला. ह्या संपुर्ण प्रक्रियेला एकूण ६ तास लागले. स्पेशल ३५ मुलं जेव्हा हा बाप्पा साकारत होती त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता, बाप्पा बद्दलची त्यांची तळमळ प्रत्येक गोष्टीत दिसत होती. 

शाडूच्या मातीने घडणारी आपली राजची मूर्ती, 'इको फ्रेंडली गणेशोत्सव' साजरा करता करता गिरगांव चा राजा, पर्यावरणाचा राजा म्हणून ओळखू लागला. सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी पर्यावरण हा विषय लक्षात घेत आपण सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम राबवित आहोत. 'गिरगांवचा राजा'च्या पाद्यपुजन सोहळ्याचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाबरोबरच लहान मुलांचे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम ही झाला. तसेच कागज इन्फो कंपनीचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी त्यांच्या कंपनीचे नवीन बोधचिन्ह अनावरण करण्याचा मान या स्पेशल मुलांना दिला.

गेल्या वर्षी सरकारने "प्लास्टिक बंदी" मोहीम राबविली, पण नागरिकांना त्यांच्या घरात असलेल्या प्लास्टिक पिशव्या कुठे जमा करायच्या हा प्रश्न पडला होता. त्यावर तोडगा म्हणून मंडळाने गणेशोत्सव काळात "प्लास्टिक कलेक्शन सेंटर" उभारले. नागरिकांची गैरसोय होऊ नये हा एकच हेतू यामागे होता. यासोबतच मंडळाने एक पाऊल पुढे टाकत यंदा कागदी पिशव्यांचा वाटप, कागदी पिशव्या बनविणाऱ्यांचा सत्कार, असे उपक्रम राबवायचे ठरवले आहे.