सुश्मीता ठोकेसह अमिच कोटेचा, झी मीडिया मुंबई : ज्या सिंधुसंस्कृतीबद्दल आपण इतिहासात वाचलं.. ज्या सिंधू संस्कृतीचा अभ्यास करतच आपण लहानाचे मोठे झालो.. त्या सिंधू संस्कृतीमधील संगीत कसं असेलं??? या प्रश्नांची उत्तरं मुंबईतल्या शैल व्यास यानं शोधण्याचा विडा उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीनं सिंधु संस्कृतीतलं संगीत पुन्हा जिवंत करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय.
ही जूनी भांडी म्हणजे प्राचीन सिंधू संस्कृतीतील संगिताचा एक भाग आहेत.. ऐकून आश्चर्य वाटलं ना... पण मुंबईतल्या शैल व्यास यांनी सहा वर्ष अथक प्रयत्न करुन सिंधू संस्कृतीमधील लूप्त झालेल्या 40 वाद्यांचा शोध लावलाय. यातील 12 वाद्यांची शैल यांनी पुर्ननिर्मितीही केलीये.
या वाद्यांच्या शोधानं शैल यांना पार झपाटून टाकलं.. आणि या संशोधनात त्यांनी आपलं करियर पणाला लावलं.. स्वताची सगळी जमापुंजी त्यांनी या शोधात खर्च केली.. या कामात आता शैल यांना देशातील पुरातत्व विभाग आणि संगीत दिग्दर्शकही मदत करत आहेत..
सिंधू संस्कृतीचा अभ्यास करत असतना 2011मध्ये शैल यांना या वाद्यांचा शोध लावण्याची कल्पना सुचली.. सुरुवातीच्या 15 ते 20 दिवसांच्या शोधात त्यांच्या पदरी निराशा पडली.. मात्र नंतर त्यांनी देशभरातील पुरातत्वशास्त्रज्ञांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून शैल यांना पाच हजार वर्षांपूर्वीच्या सर्व वाद्यांची माहिती मिळाली.. त्या आधारे त्यांनी अनेक साऊंड इंजिनिअरर्सच्या मदतीनं या वाद्यांची पुनर्निरमीती करण्यास सुरुवात केलीये..
शैल यांनी आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितलीये.. तशा आशयाचं ट्विटही त्यांनी पंतप्रधानांना केलंय.. सोबत साँग मिस्ट्रीचा छोटासा नमुदा देखील सादर केलाय.. भारतीय संगीताची विशाल पंरपरा जगाच्या समोर मांडण्याचं शैल यांचं स्वप्न आहे.. एक अशी परंपरा जी काळाच्या ओघात लूप्ल झालीये.. जीला लोकं कायमचे विसरुन गेलेत.. एका प्राचिन देशातल्या प्राचिन संगिताची परंपरा..