धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून आदेशात फेरफार

 सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.

Updated: Jan 24, 2021, 05:36 PM IST
धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून आदेशात फेरफार title=

मुंबई : मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून आदेशात फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातून हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंजिनिअरच्या चौकशीच्या आदेशांमध्ये अफरातफर झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोट्या सहीची चौकशी सुरू असल्याचं राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.