Legislative Council Election : शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल तर काँग्रेसची या उमेदवारांना संधी

आदित्य ठाकरे यांच्या विजयात सचिन अहिर यांचा मोलाचा वाट होता. त्यांनतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुनील शिंदे यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले.

Updated: Jun 8, 2022, 03:44 PM IST
Legislative Council Election : शिवसेना उमेदवारांचे अर्ज दाखल तर काँग्रेसची या उमेदवारांना संधी title=

मुंबई : विधान परिषदेच्या ( VIDHAN PARISHAD ) १० रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर ( SACHIN AHIR ) आणि नंदुरबारचे आमशा पाडवी ( AMSHA PADVI ) यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.

शिवसेना नेते सचिन अहिर ( SACHIN AHIR ) यांनी विधानसभा ( VIDHAN SABHA ) निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावरून उतरवत शिवसेनेत प्रवेश केला होता. वरळी मतदारसंघात ( WORLI VIDHANSABHA ) सचिन अहिर यांचा मोठा दबदबा आहे. मात्र, असे असूनही त्यांचा शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी पराभव केला होता.

गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आदित्य ठाकरे ( ADITYA THACKAREY ) यांनी निवडणूक लढविली होती. आदित्य ठाकरे यांच्या विजयात सचिन अहिर ( SACHIN AHIR ) यांचा मोलाचा वाट होता. त्यांनतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सुनील शिंदे ( SUNIL SHINDE ) यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले.

आता होणाऱ्या निवडणुकीत सचिन अहिर यांना संधी देण्यात आलीय. सचिन अहिर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांची भेट घेतली. त्यांनतर त्यांनी विधान परिषदेचा अर्ज सादर केला.

सचिन अहिर ( SACHIN AHIR ) यांच्यासोबतच शिवसेनेने नंदूरबार जिल्ह्यातले आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. आमशा पाडवी ( AMASHI PADVI ) हे मुख्यमंत्र्यांच्या गुडबुकमधील नाव असून शिवसेनेतील आक्रमक आदिवासी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.

सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचे विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरले. यावेळी युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( ADITYA THACKRAEY ), सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे ( EKNATH SHINDE ), परिवहन मंत्री अनिल परब ( ANIL PARAB ) यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी आज अर्ज भरले आहेत. महाराष्ट्राची आणि जनतेची सेवा करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार आमदार म्हणून लवकरच सभागृहात दिसतील.

आता कोण जागा कुठे लढतंय हे पहाणार नाही. महाविकास आघाडीमधील सर्वच पक्ष ही निवडणूक लढवीत आहेत. हे सर्वच उमेदवार विजयी होतील. चांगले काम करण्यासाठी हे अर्ज दाखल केले आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

काँग्रेस उमेदवार ठरले

काँग्रेसने मुंबई प्रदेश अध्यक्ष भाई जगताप ( BHAI JAGTAP ) आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे ( CHANDRAKANT HANDORE ) यांची उमेदवारी जाहीर केलीय. या दोघांना संधी देऊन काँग्रेसने मराठा आणि दलित समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. 

राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर ( RAMRAJE NAIK NIMBALKAR ) यांचीही सदस्यत्वाची मुदत संपत आहे. मात्र, त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा संधी देणार अशी चर्चा आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे ( EKNATH KHADSE ) यांनाही उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे.