मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : असं सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या शिवाजीपार्कचा आता मेकओव्हर होणार आहे. 1 लाख स्केअर मीटरच्या या मैदानात आता इतर खेळांसाठीही सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेनं जवळपास 5 कोटींचं बजेट ठेवलं आहे.
शिवाजी पार्कमध्ये आता जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक असतील, फूटबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, खो-खो, कबड्डी, टेनिस कोर्ट, क्रिकेटसाठी वेगवेगळी पीचेस तयार केली जातील, लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळं मैदान असेल.
सगळ्या खेळांना मैदान तयार करण्यात आल्यानंतरही 31 % मैदान हे शिल्लक राहतं. ती जागा विविध कार्यक्रमांसाठी वापरता येणार आहे. दोन लाख लोक सहभागी होऊ शकतील, एवढी त्या जागेची क्षमता असेल.
या मैदानानं क्रिकेटचा देव जगाला दिला आहे. आता हेच शिवाजी पार्क विविध खेळातले आणखी गुणवंत घडवणार आहे.
शिवाजी पार्क म्हणजे क्रिकेट असं एक समीकरण आहे. ती ओळख आता बदलू शकेल. मराठी खेळांना आमी इतरही खेळांसाठी इथं खेळण्यासाठी सुविधा दिली जाणार आहे ही चांगली बाब आहे.
यामुळे एक सर्व खेळांचं मैदान अशी शिवाजी पार्कची ओळख होईल. या निर्णयाचं स्वागतच करतो, असं उदय देशपांडे, समर्थ व्यायाम मंदिराचे मुख्य प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी म्हटलं आहे.