महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज  शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.

Surendra Gangan Updated: Apr 1, 2018, 11:23 PM IST
महाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा title=

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज  शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.

शिवसेना सीमा बांधवांच्या पाठिशी

दरम्यान, मी फक्त सीमावासीयांच्या भावना व्यक्त केल्या. बेळगावात माझ्यावर गुन्हा दाखल होणं ही मोठी गोष्ट नाही. खरंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने असे गुन्हे स्वतःवर दाखल करून घेऊन सीमा बांधवांना आपण त्यांच्या पाठीशी आहोत, हा विश्वास द्यायला हवा.

सीमाभाग केंद्रशासित करण्यात यावा, या माझ्या मागणीत काय चुकलं ? गेल्या 65 वर्षांपासूनची ही मागणी आहे की, सीमा भाग महाराष्ट्रात विलीन करावा, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

१०० टक्के शिवसेना रिंगणात

 २० लाख मराठी भाषिक ही मागणी करीत आहेत. लोकशाही मार्गाने निवडणुकीतून कौल देऊनही त्यांचा आवाज दडपला जातोय. खरंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी केंद्राकडे ही मागणी करायला हवी तर ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठरतील.

 शिवसेना कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक १०० टक्के लढतेय. पण सीमाभागात महाराष्ट्र् एकीकरण समिती निवडणूक लढतेय. त्या ठिकाणी शिवसेना आपले उमेदवार उभे करणार नाही. उर्वरित भागात आम्ही ५० ते ५५ जागा लढतोय. पण सीमा भागात शिवसेना एकीकरण समिती बरोबर काम करेल. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसनेही हाच निर्णय घेतलाय, असे राऊत म्हणालेत. 

काँग्रेस पक्षानेही पाठिंबा द्यावा!

आम्ही जो निर्णय घेतलाय तो काँग्रेस पक्षानेही घ्यावा. खास करून महाराष्ट्रात भाजपचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यानी त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाशी बोलावं. जर आम्ही असं म्हणतो की सीमाभाग महाराष्ट्रात यायला हवा. सीमावासीयांवर अन्याय आम्ही सहन करणार नाही. राज्यपालांच्या प्रत्येक अभिभाषणात सीमाभागाचा उल्लेख आपण करत असू तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे, की त्यांनी स्वतः सीमाभागात जाऊन एकीकरण समितीच्या उमेदवारांचा प्रचार करायला हवा. भाजपचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते ! जर ते त्यांनी केलं तर त्यांना अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणवून घ्यायला अभिमान वाटेल, असे शब्दात भाजपला सुनावले.

कर्नाटकात भाजपचा गोंधळ उडाला

हे आतापर्यंत झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा पायांडा पाडावा.अमित शाह यांनी आपल्याच विधानांनी कर्नाटकात जो गोंधळ उडवला आहे, त्यामुळे तिथे भाजपमध्ये गोंधळलेलं चित्र दिसतेय. याक्षणी कुणी सांगू शकत नाही निकाल काय लागतील. पण नक्कीच काँग्रेस दोन पाऊलं पुढे दिसतोय. पण पुढे प्रचारात मोदी आणि भाजपचे अन्य नेते उतरतील तेव्हा काय होईल हे आता सांगता येणार नाही, असे राऊत म्हणालेत.