टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेचे मतदान

 केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास ठराव दाखल केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2018, 06:38 PM IST
टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात शिवसेनेचे मतदान title=

मुंबई : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात तेलगु देसम पार्टीने अविश्वास ठराव दाखल केलाय. मात्र, टीडीपीने शिवसेनेला आमच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, शिवसेनेने टीडीपीला ठेंगा दिलाय. शिवसेना मोदी विरोधातील टीडीपीच्या अविश्वास ठरावाविरोधात मतदान करणार आहे.

Chandrababu Naidu calls for 'constructive agitation' to press demand for special status to Andhra Pradesh

मोदी सरकारविरुद्ध पहिल्यांदाच अविश्वास ठराव मांडण्यात आलाय. अशावेळी सत्ताधारी पक्ष आणि विरोध पक्षाची आपापली स्थिती मजबूत करण्यासाठी धावपळ झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह एनडीएतील सर्व घटकांना मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी विनंती करत आहेत. त्यासाठी ते फोनवर चर्चा करत आहेत. दरम्यान, शिवसेनेची भूमिका काय असणार याची भीती सत्ताधारी पक्षाला होती. त्यामुळे शाह यांनी उद्धव यांना फोन केला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधलाय, अशी माहिती मिळतेय. 

दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये सख्य नव्हते. या दोघांमधील दरीत दिवसेंदिवस वाढतंच चालली असल्याचे सर्वश्रुत आहेच. पोटनिवडणुकीत तर हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्धच रिंगणात उतरलेले पाहायला मिळाले होते. या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. याची सलही शिवसेनेला लागून आहे. अशावेळी शिवसेना आता काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होते. मात्र, शिवसेनेने पीडीपीविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे भाजपची स्थिती अधिक चांगली झालेय.

वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेने आपल्या खासदारांसाठी एक व्हीप जारी केलाय. यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात आणि मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश जारी करण्यात आलाय. 

एनडीएचे लोकसभेत ३१० खासदार आहेत. लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या १८ आहे. मोदी सरकारविरोधातील हा ठराव मांडला असला तरी संख्याबळ असल्याने त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण विरोधी पक्ष या निमित्तान एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.