शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, शीतल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि  शीतल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी. 

Updated: Oct 31, 2019, 02:20 PM IST
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी, शीतल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी आणि दहिसरमधील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी समाजमाध्यमातून देण्यात आली आहे. एकाने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना ही धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शिवसेना नेत्या चतुर्वेदी आणि म्हात्रे यांना धमकी दिल्याप्रकरणी बोरीवलीतील एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, धमकी देणाऱ्यांनी प्रियांका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांना टॅग केले. त्याने ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, मी माझे ट्विटर अकाऊंट तपासत होते, त्यावेळी ही बाब लक्षात आल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. तसेच यानंतर त्यांनी त्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आशिष केआर द्विवेदी असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. @ASHISHKRDW2 या अकांऊंटवरू त्याने प्रियंका चतुर्वेदी आणि शीतल म्हात्रे यांना धमकी दिली.