म्हणून हा निर्णय घेतला! बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे गंभीर आरोप

आमदार यामिनी जाधव यांनी गुवाहाटीहून व्हिडिओ प्रसिद्ध करत सांगितलं कारण

Updated: Jun 24, 2022, 06:16 PM IST
म्हणून हा निर्णय घेतला! बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे गंभीर आरोप title=

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 37 आमदारांनी सध्या बंड केलं आहे. याशिवाय शिवसेना समर्थक अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.  मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना कधीही समजून घेतल्या नाहीत, असा दावा जाहीर पत्रातून शिवसेना आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार यामिनी जाधव  (Yamini Jadahav)यांनीही पक्षातील नेत्यांबद्दल आपली खंत व्यक्त केली आहे. 

यामिनी यशवंत जाधव या मातोश्रीच्या जवळच्या समजल्या जातात. त्यामुळे त्या एकनाथ शिंदे यांना सामिल झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का मालना जात आहे.  एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आमदार यामिनी जाधव यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत गंभीर आरोप केले आहेत. 

गेल्या काही दिवसातील घडामोडी घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही नक्कीच समजू शकतो पण आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत, यापुढेही शिवसैनिक राहाणार आहोत, हे जगही आम्ही शिवसैनिक म्हणूनच सोडू असं यामिनी जाधव यांनी म्हटलं आहे.

यामिनी जाधव यांनी सांगितलं निर्णय घेण्याचं कारण
यशवंत जाधव वयाच्या 17व्या वर्षापसासून आज 43 वर्ष शिवसेनेत आहेत, अनेक अडणची आल्या. आर्थिक अडचणी आल्या अनेकदा निवडणुका हराव्या लागल्या. पण कधीही त्यांनी पक्षाबाबतीत वेगळा विचार केला नव्हता. 

गेले काही महिने म्हणजे ऑक्टोबरपासून माझ्या आयुष्यात कॅन्सर नावाचं वादळ आलं, ज्या वेळी हे माझ्या कुटुंबाला कळलं तेव्हा संपूर्ण कुटुंब कोसळलं, माझ्या कॅन्सरची माहिती यशवंत जाधव यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना दिली. एक महिला आमदार म्हणून माझी अपेक्षा होती, की माझी विचारपूस करायला काही नेते माझ्या घरी येतील.

कॅन्सरने मी कोलमडून गेली होती, माझ्या कुटुंबाने माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला साथ दिली, त्यांचे आभार मानते. पण अपेक्षा होती पक्षातील नेत्यांकडून विचारपूस केली जाईल, आधाराची एक थाप यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या कुटुंबाला मिळेल, पण तसं झालं नाही. काही ठराविक लोकं म्हणजे किशोरी पेडणेकर माझ्या घरी आल्या, कॅन्सरबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. 

पण ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या कोणीही माझी विचारपूस केली नाही, माझी मरणाशय्य अवस्था झाल्यावर माझे नेते बघायला आले असते का? ही गोष्ट कुठेतरी खलत होती मला. त्याशिवाय गेल्या सात आठ महिन्यांपासून अनेक संकटांचा सामना माझं कुटुंब करत आहे. त्यातही कोणाचा आधार, कोणाच्या सूचना, कोणाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं नाही. त्यानंतर आम्ही या निर्णयाला येऊन पोहचलो. 

हा निर्णय घेणं सोप नव्हतं, बऱ्याच दिवसांपासूनचीही प्रक्रिया होती, मनाला आजही यातना होतायत, पण एक मात्र खरं आहे की शिवसेना सोडून कोणताही पक्ष यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी जॉईन केलेला नाही. शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे असं आवाहन आमदार यामिनी जाधव यांनी केलं आहे.