ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणा हस्तक्षेप करत आहेत. यावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी या पत्रात केली आहे.

Updated: Feb 9, 2022, 01:23 PM IST
ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव, नकार दिल्यानंतर EDकडून त्रास : संजय राऊत title=

मुंबई : MP Sanjay Raut has written a letter to Vice President Venkaiah Naidu : शिवसेना नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचे दिसून येत आहे. याबाबत शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्र लिहून उपराष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. सुजित पाटकर यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने टाकलेल्या छाप्यावरून राजकारण तापले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे सरकार  (Maharashtra Govt) पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Shiv Sena leader and Rajya Sabha MP Sanjay Raut has written a letter to Vice President Venkaiah Naidu, making serious allegations)

संजय राऊत यांनी यासोबतच त्यांनी उपराष्ट्रपतींना हस्तक्षेप करून कारवाई करण्याची विनंती केली आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र लिहिले आहे. शिवसेना नेते आणि त्यांचे नातेवाईक यांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केले जात आहे, अशी तक्रार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राऊत यांनी पत्र लिहून ही तक्रार केली आहे. शिवसेना आमदार, खासदार, नेते त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार यांना त्रास देण्याची एकही संधी केंद्रीय तपास यंत्रणा सोडत नाही, असे या पत्रात म्हटले आहे. भाजपशी युती तुटल्यानंतर हा त्रास देणे सुरू झाले आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 

संजय राऊत यांचा कट रचल्याचा आरोप 

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयावर (ED) गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीवर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे. त्यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत 'सत्यमेव जयते' असे लिहिले आहे.

संजय राऊत यांचा EDवर थेट आरोप

संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या मुलीच्या लग्नात सहभागी असलेल्या विक्रेत्यांना त्रास देत आहे. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीने त्यांचे कुटुंब, मित्र आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी डेकोरेशनचे काम करणाऱ्या लोकांना ईडीने जबरदस्तीने बोलावल्याचा आरोप करत कामाच्या मोबदल्यात संजय राऊत यांच्याकडून 50 लाखांची रोकड घेतली आहे. तसेच त्यांनी दिले होते, असे वदवून घेण्याचा प्रकार दिसून येत आहे. जेणेकरुन संजय राऊत यांना पीएमएलए प्रकरणात अडकवता येईल, असे या पत्रात म्हटलेय.

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी धमकी

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशिवाय संजय राऊत यांनी हे पत्र राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पाठवले आहे. आपल्या पत्रात संजय राऊत यांनी असेही नमूद केले आहे की, काही काळापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र सरकार पाडण्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला होता, जेणेकरून महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका व्हाव्यात. त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे. 

मदत न केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही या लोकांनी दिल्याचे शिवसेना खासदार सांगतात. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात पाठवल्याचे सांगण्यात आले.

संजय राऊत यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर कारवाई 

1034 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांचा जवळचा सहकारी प्रवीण राऊत याला अटक केली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्या मुलींच्या फर्ममध्ये भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता.