shiv Sena Symbol Row LIVE : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं यावर काय निर्णय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. संपूण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण (Shiv Sena Symbol) निवडणुक आयोगासमोर सुनावणी (Election Commission India) झाली. शिवसेना पक्षावर दावा करण्यासह शिवसेनेचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली (Maharashtra Political News). ठाकरे आणि शिंदे गटाचा युक्तीवाद संपला आहे. निवडणुक आयोग 20 जानेवारीला धनुष्यबाणाचा अंतिम फैसला देणार आहे.
शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे. मुंबईतील अंधेरी-पूर्व निवडणुकीच्या निमित्ताना निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्याचवेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व निवडणुकीत हे चिन्ह वापरता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी द्या, अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्रं सादर केली आहेत.
ठाकरे गटाकडे (Thackeray Group) 14 आमदार आणि 7 खासदार आहेत. याशिवाय विधानपरिषदेचे 12 आणि राज्यसभेचे तीन खासदारही ठाकरेंसोबत आहेत. तर शिंदे गटाकडे 40 आमदार आणि 12 खासदार आहेत. ठाकरे गटाकडून तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली. तर, ठाकरे गटाची एकूण प्राथमिक सदस्य संख्या 20 लाख असून, शिंदे गटाची सदस्य संख्या 4 लाख 80 हजार इतकी आहे. ठाकरे गटानं 23 लाख कागदपत्रं सादर केली तर, शिंदे गटानं 4 लाख कागदपत्रं सादर केली आहेत.
निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटांकडून वकिलांच्या फौजा उभ्या करण्यात आल्या. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. तसेच ॲड देवदत्त कामत ॲड सनी जैन यांनी देखील ठाकरे गटातर्फे युक्तीवाद केला. महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडली. तर, शिंदे गटाकडून ॲड महेश जेठमलानी, ॲड मनिंदर सिंह आणि निहार ठाकरे यांनी बाजू मांडली.
ऑक्टोबर 2022 मध्ये अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लागली होती. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे नाव धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ लागली होती. अखेर शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. असा निर्णय देत निवडणुक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटासा जबरदस्त झटका दिला. यांनतर शिंदे गट ढाल-तलवार घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरला. तर, ठाकरे गटाने मशाल चिन्हावर ही निवडणुक जिंकली. यावेळी पक्षाच्या नावाबाबतही निर्णय झाला होता. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. तर, शिंदे गटाने ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळले.