Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?

Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे. 

Updated: Feb 28, 2023, 11:46 AM IST
Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले? title=
Share Market Sensex and Nifty Today nifty falls again on 17343.35 points read the latest updates share market news in marathi

Share Market Sensex and Nifty: शेअर मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उसळी (Share Market Today) पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चढउतार (Share Market Nifty Update) दिसते आहे आणि त्यानुसार त्या वेगळीच चढाओढ पाहायला मिळते आहे. किंबहूना निफ्टीत गुंतवणूक (Investing in Nifty) करणाऱ्यांची संख्या अधिक असते त्यातून निफ्टीमध्येच मोठी घसरण पाहायला मिळते आहे. सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर्सही घसरताना दिसत आहे. त्यातून गौतम अदानींच्या हिंडनबर्गच्या (Hindenberg Impact on Adani) अहवालानंतर तर शेअर मार्केटमध्ये एक वेगळीच चिंता सतावू लागली आहे. परंतु यंदा सेनसेक्समध्ये तेजी आणि निफ्टीत मात्र घसरण दिसते आहे. मागच्या काही सत्रांमध्ये निफ्टीत घसरण दिसते आहे. त्यातून मागच्या काही महिन्यांमध्ये बॅंकेच्या क्षेत्रात मोठी चढाव पाहायाला मिळाली होती. (Share Market Sensex and Nifty Today nifty falls again on 17343.35 points read the latest updates share market news in marathi)

सध्या आयटी (IT Sector in Share Market) क्षेत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यातून अद्यापही ही घसरण कायम असून आता ऑटो क्षेत्रात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे. शेअर मार्केटमध्ये मध्यंतरी निफ्टी (NSE Nifty) हा 17,000 च्या श्रेणीत होता त्यातून तो अद्यापही वाढला नाही. अशावेळी निफ्टीत फार मोठ्या प्रमाणात घसरण होत असून लेटेस्ट अपडेटनुसार, निफ्टी हा 9.45 टक्क्यांनी घसरला आहे आणि आताचे त्याचे रेट्स हे 17,343.35 नं आपटला आहे. ही आकाडेवारी एनएसई निफ्टीची आहे. त्याच बाजूला आता सेन्सेक्स (BSE Sensex) हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. बीएसई सेन्सेक्स हा 58.26 अंकांनी वाढला आहे आणि मागच्या सत्रातील परफॉर्मन्सपेक्षा 59,343.61 वर उघडला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून संमिश्र सुरूवात -

येत्या जानेवारीपासून सगळ्यांचेच लक्ष हे शेअर मार्केटवर लागले होते तेव्हापासूनच्या परफॉर्मन्सनुसार निफ्टी (Nifty) हा गडगडतोच आहे. अद्यापही निफ्टीत फारशी सुधारणा नाही. त्यातून सर्वात जास्त कमाई ही अदानी एन्टरप्राईजमध्ये दिसते आहे. ही प्राईज 1301.10 असून त्यात 107.60 चा बदल पाहायला मिळतो आहे. तर सिपला या कंपनी शेअर मार्केटमध्ये आपली स्थिती गमावली आहे. ही किंमत अदानींच्या शेअर्सच्या तुलनेत 924.55 इतकी आहे. तर काहीच वेळापुर्वी आलेल्या माहितीनुसार, अदानी एन्टरप्राईजची (Adani Enterprise) किंमत ही 1285.70 नं कमी झाली आहे. त्याच्या तुलनेत हिंदलाको या कंपनीनं शेअर मार्केटमध्ये 400.95 नं आपली स्थिती गमावली आहे. ऑटो क्षेत्रात 12763. 90 रूपयांनी वाढ आहे तर मेटल क्षेत्रात 5260.60 नं घसरणं पाहायला मिळते आहे. 

कोणते शेअर्स घसरले? 

1. एसबीआय
2. भारती एअरटेल 
3. टाटा स्टील 
4. नेस्ले 
5. अॅक्सिस बॅंक 
6. रिलायन्स इंडस्ट्रीज 
7. आयटीसी 

अदानींचे कोणते शेअर्स घसरले? 

1. अदानी ट्रान्समिशन
2. अदानी टोटल गॅस 
3. अदानी ग्रीन 
4. अदानी विल्मर 
5. एससी आणि अंबूजा सिमेंट 

कोणते शेअर्स वाढले? 

1. महिंद्रा एन्ड महिंद्रा 
2. टेक महिंद्रा 
3. टाटा मोटर्स 
4. टीसीएस
5. सन फार्मा 
6. टायटन
7. एल एन्ड टी 
8. एचडीएफ सी 
9. एशियन पेंट्स
10. आयसीआयसी बॅंक 
11. विप्रो
12. इन्फोसिस