नववर्षात 'या' दिवसापासून शाळा सुरु, शिक्षण विभागाचे संकेत

कोरानामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होण्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी

Updated: Dec 29, 2020, 11:47 AM IST
नववर्षात 'या' दिवसापासून शाळा सुरु, शिक्षण विभागाचे संकेत title=

मुंबई : कोरानामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होण्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येतेय. मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा २६ जानेवारीपूर्वी सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत मुंबई, ठाणे, रायगडमधल्या शाळा सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

मुंबई पालिका शिक्षण विभागाचा मुंबई आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आलाय. शाळा सुरु करण्याबाबत आयुक्तांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. मुंबई, ठाण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ९ वी ते १२ वी शाळा सुरू करण्याचा विचार आहे.

जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती मिळतेय...मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये प्रजासत्ताक दिनाआधी म्हणजेच २६ जानेवारीआधी शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

याबाबतचा अहवाल मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे सादर केलाय..   

मुंबई, ठाण्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली पाहायला मिळतेय.. त्यामुळे आता शाळा सुरू करण्याबाबतचा विचार सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुंबई महापालिका आयुक्त घेणार आहेत.