बाप बेटे जेल जायेंगे...जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना टोला

kirit somaiya यांचा सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Updated: Apr 11, 2022, 07:48 PM IST
बाप बेटे जेल जायेंगे...जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना टोला title=

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना ट्विट करून टोला लगावला आहे. सेव्ह विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तर पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या निर्णय होणार आहे. विक्रांत बचावच्या नावाखाली जमा केलेल्या निधीचा किरीट सोमय्यांनी अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, किरीट सोमय्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात अपील करणार आहेत.

बाप बेटे जेल जायेंगे, अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे. असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

सोमय्या पितापुत्र देश सोडून पळून जातील, त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. सोमय्यांचे संबंध पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान, मेहूल चोक्सी सोबत आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे. सोमय्यांची माणसं राजभवनावर जाऊन मागच्या तारखेची कागदपत्र तयार करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.