MVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत

Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

Updated: Dec 17, 2022, 12:08 PM IST
MVA Morcha Mumbai : शिंदे - फडणवीस यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का? - संजय राऊत title=
संजय राऊत

Sanjay Raut on Maha Vikas Aghadi Morcha : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Political News) शिवराय, आंबेडकरांचा अवमान करणारे भाजपला दिसत नाहीत. त्यांनी मेंदू दिल्लीत गहाण ठेवलाय का, असा सवाल उपस्थित केला आहे. तर महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र बंद करायला हवा होता, मुख्यमंत्री स्वत:च ठाणे शहर बंद करत आहेत. आणि गृहमंत्री पाहतायत, असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे - राऊत

Maha Vikas Aghadi Morcha LIVE Updates : महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी?

महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणारच आहे. सरकारवर घणाघात होणार, या भीतीने पाय लटपटू लागले आहेत. आमच्या मोर्चाला परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेरा अटी शर्ती घालण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान महाराष्ट्रात होत आहे. त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा आहे. तुम्ही त्यांना अटी घालता, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केला.

'हे नाही करायचं; इथे उभं राहायचं नाही, हे काय चालंलय'

महाविकास आघाडीच्या मोर्चाला लावण्यात आलेल्या अटी आणि शर्तीवरून राऊत यांनी शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे. हे नाही करायचं, इथे उभं राहायचं नाही, स्पीकर लावायचं नाही, भाषण लिहून द्या. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. तसेच, यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दबलं गेले आहे, अशी जोरदार टीका राऊत यांनी यावेळी सरकारवर केली. 

संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाणे भारलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा हा मोर्चा निघाला आहे. आम्हाला कोणी रोख शकत नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांच्या निळा फेट्याची चर्चा

महाविका आघाडीच्या महामोर्चाआधी काही आंबेडकरी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. यावेळी संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं घातलं होते. यानंतर त्यांनी मोर्चा संदर्भात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी संजय राऊत यांच्या नव्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. पण संजय राऊत यांनी निळा फेटा आणि निळं उपरणं का घातलं याचीच चर्चा आता सुरु झाली आहे.