मुंबई : रुपी बँक प्रशासकीय मंडळाला तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाला कारभार पाहता येणार आहे. रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी ही माहिती दिली आहे.
रुपी बँकेनं कसोटीच्या काळात व्यवहार कुशलता दाखवली. त्याची पोचपावती म्हणून भारतीय रिझर्व बँकेनं ही मुदतवाढ दिल्याचं रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळानं म्हंटलंय. याआधी कर्जात रुतलेल्या रुपी बँकेचं विलीनीकरण सक्षम बँकेत करावं या मागणीसाठी पुण्यात ठेवीदारांनी आंदोलनं केली होती. त्यानंतर आर बी आय नं रुपी बँकेवर प्रशासकीय मंडळ नियुक्त करुन, त्यांच्याद्वारे बँकेचा कारभार सुरु ठेवला.