मुंबई : रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या आयुर्मानावर १५ वर्षांचं बंधन आणणाऱ्या बहुप्रलंबित खटुआ अहवालाच्या शिफारशी अखेर सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच काळ्या-पिवळ्या टॅक्सींसह रिक्षांच्या नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे.
#BreakingNews । रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार । लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता । खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात.https://t.co/7va86JWkAh pic.twitter.com/XQnKbZ9FOK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 11, 2020
एकूण अहवालातील अन्य मान्य शिफारशींनुसार किमान भाड्याच्या दरात वाढ होणार असून, लांब पल्ल्याचा प्रवास स्वस्त होणार आहे. सध्या रिक्षांचे किमान भाडे १८ रुपये, तर टॅक्सींचे किमान भाडे २२ रुपये आहे. शासनानं शिफारस मंजूर केलीय.
मात्र भाडं वाढवण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. शासनानं शिफारशी मंजूर केल्यामुळे भाडेवाढीचा मार्ग सुकर झालाय. प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत भाडेवाढ केव्हापासून लागू होईल याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.