RBI ने या बँकेला ठोठवला 5 कोटी रुपयांचा दंड, यात आपले अकाऊंट नाही ना?

आरबीआयने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल या बँकेवर कडक कारवाई करत 5 कोटींचा दंड ठोठावला आहे.

Updated: Jul 29, 2021, 08:53 AM IST
 RBI ने या बँकेला ठोठवला 5 कोटी रुपयांचा दंड, यात आपले अकाऊंट नाही ना?  title=

मुंबईः  RBI Axis Bank Penalty:नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अ‍ॅक्सिस बँकेला ( Axis Bank) 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेला आपल्या वैधानिक तपासणीत बँकेच्या काही बाबी समजल्यात. त्यात हे कळले होते की अ‍ॅक्सिस बँक काही तरतुदींचे पालन करीत नाही.

म्हणून अ‍ॅक्सिस बँकेला दंड  

रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सूचनांच्या काही तरतुदींचे उल्लंघन, पालन न केल्याने हे दंड अ‍ॅक्सिस बँकेला  ( Axis Bank) लागू करण्यात आला आहे. यामध्ये 'प्रायोजक बँक आणि एससीबी , यूसीबी यांच्यात कॉर्पोरेट ग्राहक म्हणून पेमेंट सिस्टमचे नियंत्रण मजबूत करणे', 'बँकांमधील सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क' आणि 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (बॅंकांनी पुरविलेल्या वित्तीय सेवा) निर्देश, 2016 यांचा समावेश आहे. . नियमांनुसार फसवणूक आणि संशयास्पद सौद्यांची नोंद न केल्याचा बँकेवर आरोप आहे.

Axis Bankच्या उत्तरावर आरबीआय समाधानी नाही

रिझर्व्ह बँकेने (RBI) यासंदर्भात अ‍ॅक्सिस बँकेला  ( Axis Bank) नोटीसही बजावली होती, ज्यामध्ये तरतुदींचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बँकेला दंड का लावला जाऊ नये, असे बँकेला विचारण्यात आले. या नोटिसीला उत्तर अॅक्सिस बँकेने दिले होते आणि वैयक्तिक सुनावणीही घेण्यात आली होती, पण रिझर्व्ह बँक या उत्तरावर समाधानी झाली नाही. त्यानंतर आरबीआयने नियमांचे अनुसरण न  केल्याने अॅक्सिस बँकेला 5 कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश जारी केला.

आणखी दोन बँकांवर दंड

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे Axis Bank शिवाय आरबीआयने दोन सहकारी बँकांवरही दंड आकारला आहे. महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला एक लाख रुपये आणि अलिबाग सहकारी अर्बन बँकेला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करीत महाबळेश्वर बँकेने बँकेच्या संचालकांच्या नातेवाईकास कर्ज दिले होते. अलिबाग सहकारी बँकेला एकूण प्रदर्शनाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड आकारण्यात आला आहे.

14 बँकांना दंड ठोठावण्यात आला

काही दिवसांपूर्वी आरबीआयने 14  बँकांकडून अनेक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वसूल केला होता. रिझर्व्ह बँकेने एनबीएफसीला कर्ज देण्यासह नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एसबीआय, बँक ऑफ बडोदा, इंडसइंड बँक, बंधन बँकेसह 14 बँकांवर 14.5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून बँक ऑफ बडोदाने जास्तीत जास्त 2 कोटी रुपये दंड वसूल केला.