मुंबई : रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनायाने (GST Intelligence Director General) ही कारवाई केली आहे. दरम्यान, सुनील गुट्टे (Sunil Ratnakar Gutte) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुनील हायटेक इंजीनिअरिंग लिमिटेडचे (Sunil Hitech Engineering Limited) संचालक सुनील रत्नाकर गुट्टे यांना अटक केली आहे. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) म्हणजेच आयटीसीचा वापर आणि दुसऱ्याला दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर, ५२० कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा, सुनील गुट्टे यांच्यावर आरोप आहे.
सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने अंदाजे तीन हजार कोटी रुपयांच्या बनावट पावत्या दिल्या आणि घेतल्या. यात ५२० कोटींचा आयटीसी समाविष्ट आहे. या बोगस बिलांचे देशभरात लाभार्थी आहेत. संपूर्ण भारतात बनावट आयटीसी कार्टेलमध्ये सहभागी प्रमुख घोटाळेबाज कंपन्यापैकी, सुनील हायटेक कंपनी एक असल्याचे जीएसटी विभागाने म्हटले आहे. या प्रकरणी सुनील गुट्टे याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.