मुंबई: मुलुंडच्या गवाणपाडा परिसरात एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलुंडच्या गवाणपाडा परिसरामधील एका काम सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम साइटवर ही घटना घडली . या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती . पण या मुलीचे नातेवाईक दहशतीखाली होते. अखेर एका महिलेने या संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी सावरकर रुग्णालयात धाव घेत या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.