व्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं, प्लास्टिक बंदी शिथिल

राज्यात उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार आहे. 

Updated: Jun 27, 2018, 08:57 PM IST

मुंबई : राज्यात उद्यापासून प्लास्टिकबंदी शिथिल होणार आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात छोट्या व्यापाऱ्यांसमोर सरकार नमल्याचं चित्र समोर आलंय. किराणा आणि इतर दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुट्ट्या वस्तू बांधून देऊ शकतात. त्यासाठी नवं परिपत्रक काढण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी झी २४ तासच्या मुक्तचर्चा कार्यक्रमात बोलताना केली. प्लास्टिकबंदीला मनसेचा विरोध हा व्यापारी हिताचा आणि सुपारीबाज राजकारणाचा परिणाम असल्याचा आरोपही त्यांनी केला.