'जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा'

चौकशी करायची असेल तर शिवसेनेच्या मंत्र्यांचीही करा

Updated: Oct 16, 2020, 07:40 PM IST
'जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा निर्णय सुडबुद्धिचा' title=

मुंबई : जलयुक्त शिवार या शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या योजनेची चौकशी करण्याचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  महाविकास आघाडी सरकार ने घेतलेला निर्णय सूडबुद्धीने घेतलेला निर्णय आहे. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करायची असेल तर तत्कालीन महायुती सरकार मधील शिवसेनेच्या मंत्र्यांची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी केली आहे. 

 शिवसेने नेते सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू अशी घोषणा केली होती मात्र अजून त्या दृष्टीने कोणते एक तरी पाऊल महाविकास आघाडी सरकार ने टाकले आहे का? कधी करणार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा?  आता झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची उभी पिके भिजून वाहून गेली आहेत. त्यांना तातडीने १५ लाखांची मदत शासनाने द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रामदास आठवले यांनी केली आहे.

बॉलिवूड प्रकरणावर बोलताना आठवले म्हणाले की, फिल्म इंडस्ट्री मुंबईबाहेर नेण्यास आमचा विरोध आहे आणि राहील. फिल्म इंडस्ट्री मुंबईचं सर्वात मोठं आकर्षण आहे. अमिताभसारखे कलाकार इथे आले आणि बिग बी झाले. फिल्म इंडस्ट्री मुंबईतच राहायला हवी. तसेच ड्रग्स घेणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीत काम देऊ नये, अशी आमची मागणी आहे.