मुंबई : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर व्हावी, तसेच ही नाराजी दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, अशी आपली इच्छा असल्याचं आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच ते त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहेत. शिवाय युती झाली, तर दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेनं आपल्यासाठी सोडावी, अशीही मागणी देखील केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी झी २४ तासशी बोलताना केली.
१) दलित ऐक्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी भाजपची साथ सोडायला तयार आहे !
२) उद्धव ठाकरे यांच्याशी मोदींनी व्यक्तिश: बोलून त्यांची नाराजी दूर करायला हवी. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं.
३) माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा.
४) मी मंत्रीपद सोडावं अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसने, आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले ?