प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा २०१९च्या निवडणुकांआधी मेळावा असल्याने याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळे वातावरणनिर्मिती करण्यासाठी फलक जोरात आहे. दादरच्या शिवाजी पार्क आणि शिवसेना भवन परिसरात भव्य फलकबाजी करण्यात आलीय.
या पोस्टरवर रामाचे चित्र असल्याने या दसरा मेळाव्यात अयोध्या विषय असणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत. या मेळाव्याची तयारीही अंतिम टप्प्यात आलीय.
दरम्यान, . यंदा मेळावा आयोजनाची जबाबदारी पक्षात कुशल संघटक म्हणून ओळखले जाणारे कॅबिनेट मंत्री-नेते एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलीय. नुकतीच, मंत्रालयात पोलीस प्रशासनाशी मेळावा व्यवस्थापनाबाबत चर्चा केल्यानंतर शिंदे यांनी प्रत्यक्ष शिवाजी पार्कात येऊन जागेची पाहाणी केली. यंदाचा दसरा मेळावा लोकसभा निवडणुकीआधी होत असल्यानं त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालंय.