या अभिनेत्रीसाठी राम कदम यांनी गोविंदांना थरावरून खाली उतरवलं...!

भाजपचे आमदार राम कदम यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात सोशल मीडियावर राम कदम यांनी गोविंदांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे.

Updated: Sep 5, 2018, 01:27 PM IST
या अभिनेत्रीसाठी राम कदम यांनी गोविंदांना थरावरून खाली उतरवलं...! title=

मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात सोशल मीडियावर राम कदम यांनी गोविंदांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. घाटकोपरमध्ये भाजपचे आमदार राम कदम दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात. या दहीहंडी उत्सवाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात, दहीहंडीचे थर लावले जात असताना, या सेलिब्रिटी डान्स करतात, डायलॉग बोलून दाखवतात. दहीहंडीच्या कार्यक्रमात देखील असंच झालं, आणि राम कदम यांनी गोविंदांना थेट थांबण्यास सांगितलं आणि हाताशी आलेली दहीहंडी सोडून गोविंदांना खाली उतरावं लागलं.

या अभिनेत्रीच्या डायलॉगमुळे गोविंदांना खाली उतरावं लागलं...

आमदार राम कदम हे मंचावर प्राची देसाई यांच्याशी बोलत होते, या दरम्यान प्राची देसाई डायलॉग म्हणून दाखवत होत्या, गोविंदांनी देखील तिकडे सात थर लावले होते, गोविंदा दहीहंडी फोडणार त्याच क्षणी राम कदम यांनी सांगितलं की, थांबा, त्याला खाली उतरवा, अजून फोडू नका.

संबंधित बातम्या

व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा

या तरूणीकडून भाजप आमदार राम कदम यांना ओपन चॅलेन्ज

हे ऐकून अभिनेत्री प्राची देसाईला देखील धस्स झालं, ती देखील छातीवर हात ठेवत अवाक झाली. पण राम कदम यांनी आधी तुम्ही बोला असं सांगत गोविंदांना थांबवलं, पण गोविंदा अशा स्थितीत होते की, थांबणे शक्य नव्हतं, त्यांना खाली उतरावं लागलं.

पाहा या घटनेचा व्हायरल होणार व्हीडीओ खाली....

पाहा हा संपूर्ण व्हीडिओ